मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे. 


देशभरात ७३० हून अधिक जणांना कोरोनीची लागण झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७० लोकांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.