अहमदनगर : शिर्डी शहरातील अतिक्रमणं काढताना २००४ उसळलेल्या दंगलीतील १४९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दंगलीत दोन सरकारी गाड्या जाळत मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेच नुकसान करण्यात आलं होतं. अखेर पोलिसांना जमावाच्या दिशेने गोळीबार करावा लागला होता. यात चारजण जखमी झाले होते. त्यानंतर शहरात पोलिसांनी मोठी धरपकड करत १७० जणांवर गुन्हा दाखल केले होते. 



मात्र या प्रकरणात सरकारी पक्ष सबळ पुरावे देऊ न शकल्याने कोपरगाव सत्र न्यायालयाने १७० पैकी १४९ जणांची निर्दोष मुक्तता केली. दंगलीचा आरोप असलेल्यांमध्ये अनेक व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींची नावे होती. साई संस्थानच्य विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेल्या सचिन तांबेंवरही आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.