कोंढवा दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
पुणे : कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे सोसायटीची संरक्षक भिंत खचली आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
कोंढवा या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या. हे सर्व मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे आहेत. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना एनडीआरएफच्या निधीतून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मृतांची नावे
दरम्यान, पुण्याच्या कोंडवा परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. मात्र गेल्या वर्षी २५ जुलैला अशाच प्रकारे मुंबईच्या वाडाळा इथल्या अॅन्टॉप हिल परिसरातील लॉईड इस्टेट या इमारतीची संरक्षक भिंत कोसळीली होती. या दुर्घटनेला चार दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. सुमारे पंधरा ते वीस गाड्या ढिगाऱ्याकाली दबल्या गेल्या होत्या. याप्रकरणी दोस्ती बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.