मुंबई : वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करणार असून वन्यप्राण्‍यांच्‍या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासोबतच वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात जनावरांचे मृत्‍यु झाल्‍यास 60 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. या आर्थिक सहाय्याचे आश्‍वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधावारी विधानसभेत दिलं. यासंदर्भात संध्याकाळी सातच्या सुमारास शासन निर्णय जारी करण्यात आलाय.


मदतीत वाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती पण आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आलीय.


'वन्यप्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत', असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.