मुंबई : तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घ्या. कारण महाराष्ट्रात (Maharashtra corona) एकट्या मार्च महिन्यात 15 हजार मुलांना कोरोनाने आपल्या जाळ्यात (15 thousand children tested corona positive in Maharashtra) ओढले आहे. चिंताजनक म्हणजे या सर्व मुलांचं वय हे 10 वर्षांखालील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर 10 मुलांमागे 2 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पालकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.


कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासूनच ज्येष्ठांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. मात्र आता लहान मुलांभोवतही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. अनेक निर्बंध शिथिल झाल्याने लहान मुलांनाही घराबाहेर नेण्यात येत आहे, त्यामुळे आता त्यांनाही कोरोना होऊ लागला आहे.


मार्चमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढलेला आहे. दररोज 30-40 हजाराच्या घरात नवे कोरोनाग्रस्त सापडत आहेत. त्यात मार्चमध्ये 15 हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. 


वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातील आकडेवारीनुसार :


  1. जानेवारीत 10 वर्षांखालील 2 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली.

  2. फेब्रुवारीत 2 हजार 700 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

  3. मात्र एकट्या मार्च महिन्यात हा आकडा वाढून 15 हजार 500 वर पोहोचला आहे.


काय काळजी घ्याल?


  1. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.

  2. त्यांना मास्क, सॅनिटायझर तसच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं महत्व समजावून सांगा.

  3. बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यास सांगा.

  4. मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणं टाळा.

  5. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.