पुणे : महिलांवर अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे अन्याय अत्याचार अनेकदा जवळच्या व्यक्तीकडून, कुटुंबातील सदस्यांकडून तर मित्रमंडळी किंवा कामाच्या ठिकाणी इतकंच नाही तर प्रवासातही होताना दिसतात.  अशीच एक घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली. वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. या नराधम पित्याने आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववीत शिकणाऱ्या या मुलीवर मागील एका महिन्यापासून तिचे वडील लैंगिक अत्याचार करत होते. घरात कोणी नसताना ते तिच्यावर जबरदस्ती करायचे. अखेर मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आई मुलीसह पोलीस ठाण्यात गेली आणि नराधम पित्याविरोधात भोसरी पोलिसात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसानांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले. सध्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.