नागपूर : एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर  पोस्ट अपलोड करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा दहावीमध्ये शिकत होता. तो काही दिवसांपूर्वी तणावात होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक घटना गड्डीगोदाम भागात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. अंतरिक्ष सचिन गजघाटे, असे या मुलाचे नाव आहे. अंतरिक्ष हा आई आणि त्याच्या लहान बहिणीसह आजोबाकडे राहात होता. अंतरिक्षने साहिल गजराज या नावाने फेसबुक अकाउंट उघडले होते. तो तणावात होता, असे सांगण्यात येत आहे.  


त्यांने एक पोस्ट शेअर केलेय. त्यात त्यांने म्हटलेय, दीदी बाय, अब मै तुम लोगो को कभी भी नही दिखूंगा, क्यूं की, मै आज, ... मेरे पापा का ध्यान रखना. तुम सब लोग, ओके ना दीदी. आय लव्ह यू... माय होल फॅमिली, आय मिस यू माय होल फॅमिली.