मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३८७४ नवे रुग्ण आढळून आले. तर १६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२८,२०५ इतका झाला आहे. यापैकी ५८,०५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ६४,१५३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत आज ११९७ नवे रुग्ण सापडले. तर १३६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६५,२६५ इतका झाला आहे. तर मुंबईतील एकूण मृतांची संख्या ३५५९ इतकी झाली आहे. 


राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चाललेय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ५९८४ इतकी झाली आहे. आज मुंबईत १३६, जळगावात १०, पुण्यात ५, सोलापुरात १, औरंगाबादमध्ये ६, जालन्यात १ तर बीडमध्ये १ मृत्यू झाला आहे. तर राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.४ टक्के इतके आहे. राज्यातील मृत्यू दर हा ४.६७ टक्के आहे. राज्यात सध्या ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.