मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. पोलिस दलातही कोरोनामुळे चिंतेच वातावरण आहे. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १,६६६ पर्यंत पोहोचला असून दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत १६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात पोलीस खूप महत्वाची भूमिका बजावत. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, बंदोबस्त, तपासणी यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १४८३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 



गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे करोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांना कोरोनाची लागण होत असली तरीही यामधून बऱ्या होणाऱ्या



पोलिसांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. ४७८ पोलिसांनी कोरोनाच्या विषाणूशी यशस्वी लढा दिला आहे. यामध्ये ३५ पोलीस अधिकारी आणि ४३८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.