प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : नायजेरियामध्ये(Nigeria) एमटी हेरॉइक नावाच्या तेलवाहू जहाजावर( oil tanker MT Heroic) 26 जणांना बंदी करून ठेवण्यात आले आहे. यामध्ये 17 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यात विरारचा(Virar) प्रणव शिंदे नावाच्या तरुणही आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करुन या तरुणांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवावे असे हे तरुण व्हडिओच्या माध्यमातून सांगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईतील ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देत आहे. या कंपनीत काम करणारा प्रणव शिंदे हा तरुण मुंबई जवळच्या विरार मध्ये राहणारा आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 
या व्हिडीओनुसार त्यांना जहाजामध्ये बंदी करण्यात आले आहे. हे जहाज ईक्वेटोरीयल गिनी मधून दुसऱ्या जहाजाने टो करून नायजेरिया मध्ये नेले जात असल्याचे हे तरुण व्हिडिओच्या माध्यामातून सांगत आहेत.  


जहाजावर आमचा छळ केले जातं असून आमचे मोबाईलही काढून घेतले आहेत. त्यामुळे आम्हा 17 भारतीय नागरिकांची राज्य व केंद्र सरकारने सुटका करावी अशी मागणी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.