नाशिकमध्ये 70 किलो घातक ड्रग्जसह दोघांना अटक
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक : पोलिसांनी पॉपी स्ट्रॉ अर्थात बुक्की पावडर नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमली पदार्थसह दोघांना अटक केलीय. नाशिकमधील सुरेंद्र पालसिंग आणि रतन मोराडे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. ड्रग्स आणि गांजा पेक्षाही बुक्की पावडर घातक असल्याने या दुर्मिळ ड्रग्जला मागणी असते. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जवळपास 70 किलो पॉपी ड्रग्स सापडला आहे. नाशिक पोलिसांना या बाबत गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार छापा टाकत युनिट एकच्या पोलीस कर्मचाऱ्यांची ही धडक कारवाई केली.
साडेतीन लाखांहून अधिक रकमेचे हा साठा असून पॉपी ड्रग्स आणि रॉ मटेरियल मिळून 103 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं. डगाव नाका परिसरातील मुंबई आग्रा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून नाशिक पोलीस अधिक तपास करत आहे.