रायगड : रोहा तालुक्‍यातील सारसोली येथील दोन मुलांचा मुरूडच्‍या फणसाड अभयारण्‍यातील धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. ओंकार बिरवाडकर आणि गौरव बिरवाडकर अशी त्‍यांची नावे आहेत. उन्हाळ्याची सुट्टी असल्‍याने दोघेही भाऊ मांडला येथील आपल्‍या नातेवाईकांकडे आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुपारी ते गावातील मित्रांसोबत तेथून जवळच असलेल्‍या फणसाड अभयारण्‍यातील धरणात पोहायला गेले. पोहत असताना पाण्‍याचा अंदाज न आल्‍याने दोघेही बुडाले. त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. स्‍थानिकांनी होडीच्‍या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे सारसोली गावात शोककळा पसरली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्‍छेदनासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आणले असून रेवदंडा पोलीस या दुर्घटनेची चौकशी करत आहेत.