कल्याण : कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून दोन कैदी पळालेत. जेलच्या उंच भिंतीवरून त्यांनी पलाय़न कसं केलं हे सीसीटीव्हीत कैद झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेव्हीड मुरगेश देवेंद्रम आणि मनिकांतम नाडर अशी दोघांची नावं आहेत. ते दोघे चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातले कैदी आहेत. 


सकाळी पावणेसातच्या सुमाराला हे दोघं पळाले. दोरीच्या सहाय्याने हे दोघे सुरक्षा भिंतीवर चढले आणि अगदी आरामात तिथून त्यांनी पोबारा केला. या सर्व घटनेदरम्यान तुरूंगातील सुरक्षा यंत्रणा झोपली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय.