१६० पोलीस शिपायांच्या जागांसाठी २० हजार अर्ज
या पोलीस भरतीसाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत आहेत. अहमदनगरची पोलीस भरती आता हायटेक झालीय.
पालघर : पालघर जिल्ह्यातील १६० पोलीस शिपाई जागांसाठी जवळपास २० हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहे. त्यापैकी ९८ उमेदवार उच्च विभूषित आहेत. पालघर इथल्या कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी स्पर्धा सुरू आहे.
पोलीस भरतीसाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार
दररोज १५०० ते २५०० उमेदवार सहभागी होत असतात. या पोलीस भरतीसाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत आहेत. अहमदनगरची पोलीस भरती आता हायटेक झालीय.
सीसीटीव्ही केमेरे, ड्रोनचा वापर
दुसरीकडे, पोलीस भरतीमध्ये होत असलेले गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सीसीटीव्ही केमेरे, ड्रोनचा वापर केलाय. धावण्याच्या चाचणीसाठी वेगळी चीप आणि उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी बायोमेट्रिक नोंदणी पद्धतीचा वापर करण्यात आलाय.