Mumbai Crime News : मुंबईत रूग्णालयातून मूल चोरणा-या बुरखाधारी महिलेला कांदिवली पोलिसांनी अटक केली. ही महिला कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी करून फरार झाली होती. ही संपुर्ण घटना CCTV कॅमे-यात चित्रित झाली. CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉस्पिटलमधून मूल चोरणाऱ्या बुरखाधारी महिलेला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी करून फरार झाली होती. कांदिवली पोलिसांनी महिलेला अटक करून 20 दिवसांच्या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.


बाळ चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये बुरखा घातलेली एक महिला एका मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी महिलेला अटक केली. बुरखा घातलेली महिला मूल चोरून मालवणीच्या दिशेने निघाली. पोलीस मुलाचा शोध घेत असल्याचे महिलेला समजताच बुरखा घातलेल्या महिलेने बाळ वनराई पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवले. वनराई पोलिसांनी बाळाची माहिती कांदिवली पोलिसांना दिली. बाळाचा ताबा घेतल्यानंतर कांदिवली पोलिसांनी आरोपी बुरखा घातलेल्या महिलेला मालाड येथून अटक केली.


महिलेकडे चौकशी केली असता महिलेचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाल्याचे उघड झाले. पण तिला मूल होऊ शकले नाही. यामुळे तिने बाळ चोरीचा प्रयत्न केला.  या घटनेनंतर आता शताब्दी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि केअरटेकरवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज शेकडो महिला आपल्या नवजात बालकांना शताब्दी रुग्णालयात घेऊन येतात. अशा स्थितीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता कोणाची असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


कांदिवली येथील तरुणाची नालासोपारा येथे हत्या


मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर सिंग असं या हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो घर खरेदीसाठी नालासोपाराच्या गौराई पाडा परिसरात आला होता, यावेळी सहा ते सात आरोपींनी त्याचे रिक्षातून अपहरण करून गौराई पाड्यात असलेल्या यादवेश शाळेच्या बाजूला खुल्या मैदानात कोयता व दांडके व धारदार शस्त्राने त्यावर हल्ला करून हत्या केली. मृत  सुधीर हा यापूर्वी पांडे नगर परिसरात राहत होता पूर्व वैमस्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना असून पेल्हार पोलीस अधिक तपास करत आहेत.