ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास
एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय.
ठाणे : एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय.
एक-दोन नव्हे तर तब्बल 14 ग्राहकांच्या बँक खात्यातून 3 लाख 57 हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी आपला डाव साधला.
विशेष म्हणजे कळव्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी कळवा नाका येथे असलेल्या एका बँकेच्या एटीएम मधून देखील असेच कार्ड क्लोनींग करून खातेदारांचे पैसे काढण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.