नागपूर : शहरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघात तीन तरुणींचा मृत्यू झाला. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह या तिघींच्या नातेवाईकांनी तिघींचे मृतदेह नागपूर मेट्रोच्या कार्यालयाबाहेर आणून मेट्रो विरोधात निदर्शनं केली. मेट्रोच्या हलगर्जीपणामुळे या तिघींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात सुरू असलेल्या मेट्रोच्या क्रेनमध्ये आल्याने या तीनही तरुणींचा मृत्यू झाला. श्रुती बनवारी, स्नेहा अंबाडकर आणि रुचिका बोरीकर अशी मृत तरुणींची नावं आहेत. या तीनही तरुणी एलएडी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होत्या. सकाळी महाविद्यालयातून दुसरीकडे जाण्यासाठी एकाच दुचाकीवर निघालेल्या या तिघी, अंबाझरी टी पॉईंट जवळ पोहचल्यावर समोरून रिवर्समध्ये येणाऱ्या क्रेनला धडक दिली. क्रेनखाली आल्याने तिघांच्याही जागीच मृत्यू झाला.