दीपक भातुसे / नागपूर :  सहा महिन्यात जवळ जवळ तीन  हजार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती विधानसभेतल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात यावर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात दोन हजार नऊशे पासष्ट अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत दोन हजार आठशे एक्यांशी मुली बेपत्ता झाल्या होत्या.


या आकडेवरीमुळे मुलींच्या तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.  मुंबईत अल्पवयीन मुलांना आणि तरूणींना पळवणाऱ्यांची टोळी काम करत असल्याबद्दल कोणताही गुन्हा दाखल नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 


ठळक बाबी


- राज्यात या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 2965 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे
- मुंबईत अल्पवयीन मुलांना , तरुणींना भुलवून पाळवणार्या टोळी बाबत कोणताही गुन्हा नोंद नाही . कोणताही गुन्हा नोंद नसल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे
- मात्र त्या बरोबरच जानेवारी 2016 ते जून 2016 याकाळात 2881 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत
- तर जानेवारी 2017 ते जून 2017 या वर्षात 2965 मुली बेपत्ता झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली
- राज्यात अल्पवयीन आणि हरवलेल्या मुलांचा शुद्ध घेण्यासाठी 12 पोलीस घटकांमध्ये ऊशेष अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
- 18 वर्षाखालील हरवलेल्या मुला- मुलींच्या तपासासाठी स्वतंत्र पथकाद्वारे शोध मोहीम , समाजात प्रबोधनात्मक जन जागृती ,हरवलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांच्या गॅझेट मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी जुलै 2015 ते 2017 या कालावधीत ऑपरेशन मुस्कान आणि स्माईल अंतर्गत बेपत्ता अशी नोंद असलेल्या बालकांपैकी 1613 बालकांचा शोध घेतला
- तर यावर्षी 645 बालकांचा शोध लावण्यात संबंधित पथकाला यश आले आहे