COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशीष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत झालेल्या चकमकीतनंतर नक्षलवाद्यांचे मृतदहे सापडत आहेत, त्यामुळे रविवारी आणि सोमवारी झालेल्या चकमकीत, मारल्या गेलेल्या नक्षलवादींचा आकडा आणखी वाढत आहे. या चकमकीमुळे नक्षलींचा मोठ्या प्रमाणात येथे कणा मोडला गेला असल्याचं म्हटलं जात आहे. गडचिरोलीत ३ दिवसांत ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांशी रविवारी झालेल्या चकमकीत १६ मृतदेह आढळले होते. तिथे सर्च ऑपरेशन अजूनही सुरू होतं. त्यात आणखी ११ मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे रविवारी कंठस्नान घातलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता २७ झाली आहे. तर सोमवारी राजाराम खांदला जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक झाली, त्यात ६ नक्षलवादी ठार झालेत. त्यामुळे सलग ३ दिवस नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेत ३३ नक्षलवादी ठार झालेत. यानंतर पोलिसांनी या मोहिमेचं यश साजरं देखील केलं आहे.


पोलिसांच्या जवानांनी यावर नाचून आनंद व्यक्त केला आहे. नक्षलविरोधी मोहिमेतील मागील अनेक वर्षापासून ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी पोलिसांचे कौतुक केले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार आहे किंवा नाही, हे अजून स्पष्ट नसलं, तरी पुढील कारवाईनंतर समजणार आहे.