सातारा : छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रमाचा साक्षीदार असणारा, प्रतापगड किल्ला ३५७ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी येथे मशाली पेटवल्या जाऊ लागल्या हा अनोखा नजारा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तानी प्रतापगडावर गर्दी केली होती. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना १६६१ मध्ये प्रतापगडावर केली या घटनेला २०१० मध्ये ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविण्यात आल्या. आता प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये १मशालीची वाढ होते आहे .


या वर्षी ३५७  मशालीनी किल्ला तेजोमय झाला होता. ढोल गजराच्या ताशात या गडाच्या पूर्ण तटाच्या बाजूला मशाली पेटवल्या हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.