नागपूर : कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होवून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह रक्कम द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपाशीवर फवारणी दरम्य़ान राज्यात जवळपास ५१ शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील २१ शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश होता. या प्रकरणी राज्य सरकारनं पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येक केवळ २ लाख रुपये दिले होते.


यावर आक्षेप घेत कीटकनाशक फवारणी दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं द्यावी, अशी मागणी करणारी याचिका नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये नागपूर खंडपीठात दाखल केली होती.


राज्य सरकारने ५ किटनाशक कंपन्यांवर ६० दिवसांची बंदी घातली होती. त्याची मुदत आता पूर्ण झाली असून या पुढे सरकार कोणती कारवाई करणार? अशी विचारणाही न्यायालयानं सरकारकडं केली आहे.