कल्याण येथे विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू
विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झालाय. यात दोन मुलं आणि फायरब्रिगेडच्या दोन जवानांचा समावेश आहे.
कल्याण : विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झालाय. यात दोन मुलं आणि फायरब्रिगेडच्या दोन जवानांचा समावेश आहे. कल्याण पूर्वेच्या नेतीवली लोकग्राम परिसरात ही दुर्घटना घडलीय. विहिरीत पडलेली दोन्ही मुलं स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या मुलांना विहिरीतून बाहेर काढताना फायरब्रिगेडच्या जवानांचाही मृत्यू झालाय. तर याठिकाणी मदतीला असलेला एक कर्मचारीही विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलाय. ही मुलं विहिरीजवळ कशासाठी गेली होती याचा तपास सुरू आहे.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीच्या सफाईसाठी एक कर्मचारी उतरला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या इतर दोन व्यक्तीही विहिरीत बेपत्ता झाल्या. तर या तिघांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी उतरले होते, असे मिळून पाचही जण बेपत्ता झाले. बचाव आणि शोधकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन जणांना बाहेर काढण्यात यश आलेय.