Sindhudurg News Today: देवगड येथील समुद्रात पाच जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. चार मुली आणि एक मुलाचा यात समावेश आहे. चार मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एक अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीची सहल देवगड येथे आली होती. त्यावेळी हे पाच जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले असताना ही घटना घडली आहे.  दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पाच विद्यार्थ्यांपैकी चापर जणींचे मृतदेह हाती लागले असून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आले आहेत. 


पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीच्या 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच विद्यार्थ्यांनी समुद्रात धाव घेतली. या गृपमधील काही जण समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने यातील चार मुली आणि एक मुलगा बुडाले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, यांचा समावेश आहे. तर, राम डिचोलकर हा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहेत.