कोविडमुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत
कोविड काळात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांनी ५० लाखाची मदत दिली जाणार आहे. क आणि ड महापालिका क्षेत्रात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : कोविड काळात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांनी ५० लाखाची मदत दिली जाणार आहे. क आणि ड महापालिका क्षेत्रात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील महापालिका कर्मचारी दिवस रात्र मेहनत करत आहेत. मुंबई महापालिकेच्या तब्बल 228 कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे जीव गमवला होता. मुंबई महापालिकेकडून 91 जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत तर 90 जणांच्या वारसदारांना नोकरी दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने क आणि ड क्षेत्रातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा निर्णय घेतला आहे.
क क्षेत्रातील महापालिका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
वसई-विरार महानगरपालिका
औरंगाबाद महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
ड क्षेत्रातील महापालिका
सोलापूर महानगरपालिका
मीरा-भाईंदर महानगरपालिका
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
अमरावती महानगरपालिका
नांदेड-वाघाळा महानगरपालिका
कोल्हापूर महानगरपालिका
अकोला महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
मालेगाव महानगरपालिका
जळगाव महानगरपालिका
लातूर महानगरपालिका
धुळे महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका
चंद्रपूर महानगरपालिका
परभणी महानगरपालिका