मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज ही राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात राज्यात आज 5493 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 2330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 86,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 70,607 रुग्णांवर रुग्णालयाचत उपचार सुरु आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच आज 156 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी 60 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत. तर इतर 96 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात मृत्यूदर 4.51 एवढा आहे.  राज्यातील रिकव्हरी रेट आता 52.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.


9,23,502 नमुन्यांपैकी 1,64,626 नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,70,475 लोकं होम क्वारंटाईन असून 37,350 लोकं हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 64, ठाण्यातील 24, जळगावमधील 6, जालन्यातील 1 आणि अमरावतीमधील एका रुग्णाचा समावेश आहे.