मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आज झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत किमान आठ दिवस लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आज राज्यात 24 तासांत 55 हजार 411 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 309 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 53 हजार 5 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेक आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात एकून कोरोना रूग्णांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रूग्णांची संख्या 27 लाख 48 हजार 153 वर पोहोचली आहे. तर या विषाणूने 57 हजार 638 रूग्णांचे प्राण घेतले आहेत.  तर आता उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 5 लाख 56 हजार 682 एवढी आहे. 



तर मुंबईत आज  9 हजार 327 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 50 जणांचा बळी गेला आहे. तर दुसरीकडे 8 हजार 474 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 


कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1 हजार 996 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 634 आहे. तर एका दिवसांत 862 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.