नगर परिषदेच्या आवारात शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूरच्या काटोल तालुक्यात नगर परिषदेच्या आवारात एक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : नागपूरच्या काटोल तालुक्यात नगर परिषदेच्या आवारात एक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठिय्या आंदोलनामागे मृतदेह
दिलीप लोहे असे या शेतकऱ्याचे नाव असून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. नगर परिषदेच्या बाहेर भाजप आमदार आशिष देशमुख यांचं गेल्या ६ दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिय्या आंदोलन स्टेजच्या मागे लोहे यांचा मृतदेह सापडला.
काटोल बंदचे आवाहन
५५ वर्षीय लोहे हे मूळचे कोहळी गावातील असून सध्या ते काटोल मध्ये राहत होते. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे त्यांचे पीक नष्ट झाल्याने लोहे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे. पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने आज काटोल बंदचे आवाहन करण्यात आले.