नागपूर : नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत सहा जणांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय निवस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच सर्वांना ताब्यात घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्व नागपूर महापालिकेत कार्यरत होते. मात्र त्यांना वेगवेगळ्या अनुशासनात्मक कारणांनी नोकरीतून काढलं गेलं होतं. आम्हाला नोकरीत परत घ्या या मागणीसाठी त्यांनी ८ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता.