अमर काणे, नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची ओळख आता हत्येची राजधानी बनत चालली आहे, गेल्या 6 दिवसात नागपुरात तब्बल 6 खून झाले असून त्यामुळे नागपुरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. हत्येची ही मालिका थांबण्याचं नावचं घेत नाहीये. नागपुरात नेमक काय घडतंय हे रिपोर्टमधून जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर हे तसं पाहायला गेल्यास एक शांत शहर म्हणून ओळखल जातं, पण गेल्या सहा दिवसांपासून सलग होणाऱ्या हत्यांनी उपराजधानी नागपूर हादरलीये.  एक दोन नाही तर गेल्या 6 दिवसात 6 हत्येच्या घटनांनी शहर हादरून गेलय. दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला करत खून अशा घटना शहरात घडल्या आहेत.


पहिली हत्या  : 


25 डिसेंबर रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सचिन गुप्तावर जीवघेणा हल्ला करत खून करण्यात आली. 


दुसरी हत्या : 


26 डिसेंबर रोजी संध्याकाळी पैशाच्या मागणीतून मित्रानेच केली मित्राची हत्या. कुलदीप चव्हाण नावाच्या तरुणाची रिकेश शिक्कलवार या त्याच्या मित्राने दगडाने ठेचून हत्या केली.


हेही वाचा : 'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'


 


तिसरी हत्या : 


27 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता लुटमारीच्या उद्देशातून ऑटो चालकाने धारधार शस्त्राने वार करत अज्ञाताची हत्या केली.  


चौथी हत्या : 


29 डिसेंबर, दुपारी 3 च्या सुमारास दफन भूमीच्या 67 वर्षीय चौकीदार रमेश शिंदे याची दफनभूमीतच गळा चिरून आणि डोक्यावर दगडाने वार करून हत्या करण्यात आली. 


हेही वाचा : थर्टी फर्स्ट नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! नाकाबंदी, सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वकाही जाणून घ्या!


 


पाचवी आणि सहावी हत्या : 


29 डिसेंबर, पैशाच्या वादातून मामाने दोन सख्ख्या भावांची हत्या केली. 


नागपुरातील या हत्या वैयक्तिक वादातून झाल्या असून या हत्यांना कोणतीही राजकीय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरीही सहा दिवसांत झालेल्या सहा हत्यांमुळं नागपुरात भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.