कोयना धरणात तब्बल ७०.३४ टिएमसी पाणीसाठा
सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार आहे.
सातारा: महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांचे लक्ष लागलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने जुलै महिन्यात तब्बल ७०.३४ टिएमसीची पातळी गाठली आहे. कोयना धरण पाणलोट आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाउस सुरु असुन कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.
...तर धरणाचे वक्र दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग
सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी १५ जुलैपर्यंत धरण परिसरात ४०३७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा तो ५७६६ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. या पावसामुळे सातारा जिल्ह्यातिल कण्हेर, उरमोडी , बलकवडी व तारळी हि सर्व धरणे पुर्ण क्षमतेने भरली असुन सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
पुण्यातील धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग
दरम्यान, टेमघर, वरसगाव, पानशेत तसेच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. या चारही धरणात मिळून ५९.७६ % पाणीसाठा झालाय . टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलय. गेल्या वर्षी आजच्या तारखेला या धरणांमध्ये मिळून ३८.५९% म्हणजे ११.२४ टीएमसी इतका राणीसाठा होता. यावर्षी या धरणांमध्ये १७.४२ टीएमसी म्हणजे ५९.७६ % पाणीसाठा झालाय.