मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात ७०७४ नवे कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत. हा सर्वात मोठा आकडा असून राज्यात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. राज्यात आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील ममृयदूर ४.३३% एवढा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १,०८,०८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०२ % एवढे झाले आहे



आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १०,८०,९७५ नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह  आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाईनध्ये आहेत. तर ४१,५६६ लोक संस्थात्कम क्वारंटाईनमध्ये आहेत.


मुंबईत ८३२३७ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर ५३४६३ कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. तर ठाण्यात ४५८३३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर १७८५१ रूग्ण बरे झाले आहेत.