मुंबई: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीपासून सातवा वेतन आयोग लागू होईल, अशी घोषणा नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून त्या शिफारशी लागू करण्याची सरकारची तयारी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातवा वेतन आयोग ही राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आमची दिवाळी भेट असेल, असे त्यांनी विधानसभेत सांगितले.


राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर 21 हजार 530 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी राज्य सरकारने आधीच दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.