मुंबई : सोपा पेपर म्हणून पाहिलं जात असतानाच, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत अपेक्षाभंग झाला. त्यातच तब्बल ८ विद्यमान मंत्र्यांनाच पराभवाला सामोरं जाव लागलं. त्यामुळे भाजपाच्या यशाच्या चवीचा गोडवा हरवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघात, भाजपाच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडून परभवाचा धक्का सहन करावा लागला. 


राज्यातली लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांना, पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी आसमान दाखवलं. 


अटीतटीची लढत म्हणून पाहिल्या गेलेल्या बीडमधल्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागरनं पराभवाची धूळ चारली. 


जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. 


पुरंदर विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे विजय शिवतारे यांनाही हार पत्करावी लागली. 


मोर्शीमध्ये भाजपाचे अनिल बोंडे यांना विजयानं हुलकावणी दिली. 


मावळमधून भाजपाचे बाळा भेगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकली नाही. 


साकोलीत भाजपाचे परिणय फुके यांच्या वाट्यालाही पराभव आला.