मुलं चोरीच्या अफवांचे राज्यभरात ८ बळी, सरकारला जाग येणार का ?
अफवा आणि घटना रोखण्यात सरकार अपयश आलंय.
औरंगाबाद : अफवांनी आत्तापर्यंत राज्यात ८ बळी घेतलेत. याआधी औरंगाबादमध्ये आठवडाभरात झालेल्या अशाच मारहाणीच्या दोन घटनांमध्ये तीन जणांचा बळी गेला होता. मात्र त्यानंतर राज्यभरात मुले चोरणारी टोळी आली आहे या अफवांचं लोण पसरतच होतं... आणि ठिकठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडत होत्या. लोकांमध्ये पुरेशी जनजागृती करून या अफवा आणि घटना रोखण्यात सरकार अपयश आलं, हेच धुळ्यात पाच जणांच्या हत्याकांडाने समोर आलं आहे.
सरकारला जाग येणार का ?
त्यामुळे सरकार आता तरी जागं होईल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेईल अशी अपेक्षा आहे. लोकांनीही या घटनेतून धडा घेऊन केवळ संशयामुळे निष्पापांना मारहाण करू नये उलट संशयित व्यक्तींना पोलिसांच्या हवाली करावे अशी अपेक्षा आहे.