मुंबई : राज्याची दिवसभरातील कोरोना आकडेवारी (Maharashtra Corona Update)  समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 85 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्यांचा आकडा हा जास्त आहे. दिवसात 8 हजार 623 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate)  हा 96 टक्के इतका झाला आहे. (8 thousand 85 corona patients were found in Maharashtra today on 29th June 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसभरात 231 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.01 इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१३,९८,५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,५१,६३३ (१४.६२टक्के) नमुने पॉझिटव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२१,३७७ व्यक्ती होमक्वारटाईनमध्य आहेत तर ३,५८४ व्यक्ती संस्थात्मक विलिगिकरणात आहेत. 


संबंधित बातम्या : 


डेल्टा प्लसनंतर आता Lambda Variant चा धोका, आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा


COVID - लस नाही तर पगारही नाही! 'या' महापालिकेने काढला आदेश


राज्यात 'या' जिल्ह्यात 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण