रत्नागिरी : कोरोनाच्या (Coronavirus) डेल्टा प्लस (Delta Plus) व्हायरससंदर्भातली मोठी बातमी. रत्नागिरीत (Ratnagiri) 3 बालकांना डेल्टा प्लसची (Delta Plus) लागण झाल्यांचे समोर आले आहे. दरम्यान, या तिन्ही बालकांनी डेल्टाप्लसवर मात केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील केवळ एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. तर धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, रत्नागिरीत संगमेश्वरमध्ये पहिला बळी गेला. डेल्टा प्लसची लागण एका महिलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संगमेश्वरमधील तीन गावांना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले असून येथे कंन्टेमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात काल नव्याने 380 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 22 कोरोनाची रुग्णसंख्या झाली आहे. गेल्या 24 तासात 741 जणांना घरी सोडण्या आले आहे. बरे होण्याची टक्केवारी 87.88 टक्के असून आतापर्यंत 53 हजार 574 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात 5 हजार 710 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये 2,514 तर संस्थात्मक विलगीकरणात 2,774 जणांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण सापडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले, 15 मे पासून जवळजवळ 7 हजाराच्या वर सॅम्पल घेण्यात आले असून यांचं whole genome sequencing करण्यात आलं. ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण सापडले आहेत. पहिला रुग्ण हा रत्नागिरीत सापडला आहे. तसेच पहिला बळी रत्नागिरीत गेला आहे.