सोनू भिडे, नाशिक:- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या धकाधकीच्या जीवनात वयाच्या साठ वर्ष्यानंतर चालण सुद्धा कठीण असत मात्र नाशिकच्या जयंती किशोर काळे या ७७ वर्षीय आजींनी जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर नांदेड येथील राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत ३ गोल्ड आणि २ सिल्व्हर मेडलची कमाई केलीय. ७७ वर्षीय आजींचा हा विजय तरुणांना तोंडात बोट घालणारा आहे. जाणून घेऊया जयंती काळे यांच्या बद्दल....


कोण आहेत जयंती काळे....


जयंती किशोर काळे ह्या तश्या नाशिकच्या, त्यांचा जन्म २६/१०/४७ रोजी मालेगाव येथे झाला, त्यांनी ११ पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या सातव्या वर्ष्यापासूनच त्यांना पोहण्याचा छंद होता. मात्र वडिलांची सरकारी नोकरी असल्याने नियमित सराव करणे शक्य नव्हते.


असा केला सराव 


महिला असल्याने आजीना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र यावर मात करत आजींनी स्विमिंगचा सराव सुरूच ठेवला. घरच्यांचा विरोध असल्याने कुणालाही न सांगता त्या गुपचूप नदीवर जाऊन सराव करत असत. मात्र लग्नानंतर सासूने त्यांना प्रोत्साहन दिल्याने पोहण्यात कधीच खंड पडला नाही. 


आजींकडे आहेत ७५ मेडल 


वयाच्या ४९ व्या वर्षी आजींनी पहिले मेडल जिंकले. यानंतर आजींनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांनी अनेक सुर्वण, रौप्य आणि कांस्य असे ७५ मेडल जिंकले आहेत. तसेच विविध वयोगटातील स्पर्धक असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकांना मात देत जयंती काळे यांनी अनेक मेडल जिंकले आहेत. नुकत्याच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत त्यांना ३ गोल्ड आणि २ सिल्व्हर मेडल मिळाले आहेत.


सुना आणि नातवंडानाही दिले पोहण्याचे धडे  


आजीना स्विमिंग वर फार प्रेम आहे. त्या आजही नियमित सराव करत असतात. त्यांच्या सुना आणि नातवांनी सुद्धा नियमित स्विमिंग केल पाहिजे अशी त्यांची इच्छा असल्याने आजी आजही सुना आणि नातवाना पोहण्याचे धडे देत असतात. 


आजींचे ध्येय 


पुढील महिन्यात पंजाब येथे स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत आजी सहभागी होणार आहेत. अंतरराष्ट्रीय पदक मिळविण्याचे आजींचे ध्येय असून शरीरात ताकद असे पर्यंत स्विमिंग करत राहणार असल्याच आजींनी सांगितलं आहे.