Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच आता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ते आता पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणाराहेत. देवीच्या दर्शनानंतर ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.


काय झाडी काय डोंगार काय हाटील हा शहाजीबापू पाटलांचा डायलॉग पुन्हा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.  कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार आहेत. पण यावेळी ते सत्ताबदलासाठी निघाले नाहीत तर यावेळी ते कामाख्या देवीच्या आशीर्वादासाठी निघालेत. 2021ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आमदारांसह गुवाहटी गाठली होती. तिथ काही दिवस एकनाथ शिंदेंनी मुक्काम केला होता. आता विधानसभा निवडणूक जाहीर झालीये. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहटी दौऱ्यावर विरोधकांनी त्यांच्या खास शैलीत टीका केलीय.


महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होतेय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. आता कामाख्या देवी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा आशीर्वाद देते का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.