सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: कधी पुढे काय होईल याचा काहीचं थांगपत्ता लागत नाही. आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना (News in Maharashtra) या घडत असतात त्यामुळे आपण अजूनच सतर्क होतो. परंतु सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Viral VIDEO) पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. दोन इसमांनी आपली गाडी आणि कार पार्क (Car Prices today) करायला ठेवली परंतु अचानकच त्या दोन्ही गाड्यांनी अचानक पेट घेतला. हा धक्कादायक व्हिडीओ (VIdeo) सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. या फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (a car and a bike gets on fire nanded news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट समोर पार्क केलेल्या वाहनाना अचानक आग लागून एक कर आणि एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. नांदेड शहरात ही घटना घडली. नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. सकाळी अचानकपणे या वाहनांना आग लागल्याचे दिसून आले. आग लवकर पसरली. आगीत एक कार आणि मोटारसायकल जळून खाक झाली. या घटनेने वाहनमालकांचे मोठे नुकसान झाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. अज्ञात व्यक्तींनी आग लावली का याचा शोध पोलीस घेत आहेत. 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


तुमचे पाळीव प्राणी सुरक्षित आहेत का? 
पुण्यातील कॅम्प परिसरातून सायबेरीयन हस्की प्रजातीच्या श्र्वानला एका चोरट्याने पळून नेल्याची घटना समोर आली आहे, या प्रकरणी श्र्वानाचे मालक मोजीस डिसूजा यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, डिसूजा हे सेवानिवृत्त असून कॅम्प परिसरात दस्तूर मेहेर रोडवर वास्तव्यास आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह इथे राहायला आहेत. त्यांच्याकडे सायबेरियन हस्की (Husky) प्रजातीचे श्वान ज्याचे नाव त्यांनी "मेस्सी" ठेवले होते ते पाळले होते. 



मुलांकडे तुमचं लक्ष नाही? 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर येथे काम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा (Pune News) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रथमेश गोपाळ कडावत (वय 9, रा. भैरवनाथ नगर, किरकटवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मोलमजुरी करुन जगत असलेल्या कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या आक्रोशाने उपस्थित शेकडो नागरिक भावनिक झाले होते. प्रथमेश त्याच्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. गवंडी काम करुन घरी आलेल्या आईवडिलांनी तो दिसेना म्हणून परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.