Sanjay Raut  : तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) केला होता. हा गौप्यस्फोट करताना राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे नाव घेत गंभीर आरोप केला होता. या आरोपांनतर संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  ठाण्यातील पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.  या आरोपांमुळे शिंदे यांची बदनामी झाली. संजय राऊत यांचे आरोप समाजात तेढ, वैमनस्य निर्माण करणारे आहेत. संजय राऊत यांनी खोटे पत्र दिलय असं मीनाक्षी शिंदे यांनी तक्रारीत म्हंटले आहे. संजय राऊत यांच्या विरोधात  153 अ,501,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ठाणे क्राईम ब्रँच कडून संजय राऊतांची पोलीस चौकशी


या आरोपानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाचे एसीपी दर्जाचे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी आज संजय राऊत यांची याप्रकरणी भेट घेतली. हॉटेल एक्स्प्रेस इन मध्ये त्यांचे दोन तास जाब जबाब घेत पोलिसांनी माध्यमांशी काहीही न बोलता पुन्हा ते मुंबईकडे रवाना झाले. संजय राऊत यांचा नाशिक मध्ये दोन दिवसीय दौरा सुरू आहे.


संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केलेत?


खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thackur) याला सुपारी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvsi) यांना दिलं आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून त्यांना टास्क दिला जात असल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राचे अति बुध्दीमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून माहिती दिली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ठाण्यातील जामीनावर सुटलेल्या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सुपारी देण्यात आली आहे, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सध्या निवडणुका, पक्ष फोडणं यात अडकले आहेत, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबद्दल किती माहिती आहे हा प्रश्नच आहे. सर्व विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.