प्रताप नाईक, झी मीडिया,कोल्हापूर :  बेल्जियम शेफर्ड जातीचा कुत्रा (Belgian Shepherd Dog) पाळणे मालकाला चांगलेच महागात पडले आहे. या कुत्र्याने शेजाऱ्याच्या मुलावर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेजाऱ्याने कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरमध्ये (kolhapur) ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पाळीव प्राणी पाळण्याच ट्रेंड वाढत आहे. अनेक जण आपल्या घरात एखाद कुत्र किंवा मांजर पाळत असतो. मात्र, या पाळीव प्राण्यांना अनेक वेळा ट्रेनिंग दिल्या नसल्याकारणाने किंवा मोकळ सोडल्याने एखादी दुर्घटना घडते.अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. बेल्जियम शेफर्ड जातीच्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात हा  मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणाऱ्या रेखा हेमंत पाटील यांचा 13 वर्षाचा मुलगा सोहम याच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. सोहम हा क्लासला जात होता. यावेळी त्याच्यावर बेल्जियम शेफर्ड जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये सोहम गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पाळीव श्वानाच्या सानिध्यात नवा व्यक्ती आला तर तो श्वान हल्ला करू शकतो हे श्वनाच्या मालकांना माहिती असते, असं असताना देखील मालकाने आपल्या श्वानला दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येवू दिले. त्यामुळे या कुत्र्याने अनोळखी समजून सोहमवर हल्ला केला. 


सोहमच्या नातेवाईकांनी श्वनाच्या मालकाने हलगर्जीपणा केला म्हणून श्वानाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यापुढे अशा पद्धतीने कोणावरही असा प्रसंग येऊ नये यासाठी श्वान मालकांनी खबरदारी घेण्याची जबाबदारी घेण्याची गरज सोहमच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.


पाळीव प्राणी पाळताना प्राण्यांच्या मालकाने योग्य ती काळजी घेतली नाही तर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल होवून सहा महिन्यापर्यंतचे शिक्षा होऊ शकत अस कायदा सांगतो.  त्यामुळे श्वनाच्या प्रत्येक मालकाने आपल्या श्वनाची योग्य खबरदारी घ्यावी अस जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले आहे.


सोहम सोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर श्वानप्रेमींनी ही श्वान पाळण्यासाठी असणारे नियम ही माहित करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशी घटना घडल्यास श्वान प्रेमींना जेलवारी करायची वेळ येऊ शकते.