Tulja Bhavani Mandir :  तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-यांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आलेत.  झी २४तासच्या बातमीनंतर ही कारवाई करण्यात आलीये. देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झालेत. यात पाऊण किलोहून अधिक वजनाचा सोन्याचा मुकूटाचाही समावेश आहे.. या चोरीच्या घटनेचा झी २४तासनं सातत्यानं पाठपुरावा केला हाता. आमदार महादेव जानकर यांनी सोमवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनानं या प्रकरणी पुजारी, सेवेकरी यांच्यासह तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक अंबादास भोसले  यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील देवीचे दागिने गहाळ झालेत.. चौकशी समितीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली होती.   तुळजाभवानीच्या प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाल्या प्रकरणात मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी 13 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, तत्काळ गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीवर ठेवल्याचे सांगत चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मंदिर प्रशासनाचे कामकाज तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, असे असतांना गुन्हा दाखल करण्यात आलेल्या यादीत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.


महंत हमरोजीबुवा गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा,  महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा, महंत बजाजीबुवा गुरु वाकोजी बुवा, श्री.अंबादास भोसले तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक (मयत), दर्जेवारी रजिस्टर नुसार सेवेदारी पंलगे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. 


तुळजाभवानीचे कोणते दागिने चोरीला? 


27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब झाले आहेत.  826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट, 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र , नेत्रजोड 
माणिक मोती असे मौल्यवान दागिने गायब आहेत. मंदिर संस्थानानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. धक्कादायक म्हणजे ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवण्यात आला.. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्यात.. देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्याची काही दिवसांपूर्वी मोजदाद करण्यात आली होती याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय मात्र या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.