पुणे : Reopen Schools in Pune : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने शाळा - महाविद्यालये बंद आहेत. पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक होत आहे. सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. (A decision on Reopen Schools and colleges in Pune is expected today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शाळा - महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय  झाल्यानंतर पुण्यातील कोरोना (Coronavirus,) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस सुरु न करण्याचा निर्णय मागील आठवड्यातील बैठकीत घेण्यात आला होता. 


आठवडाभर आतील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा विधान भवन इथ आढावा बैठक होत आहे. 


मागील तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीपासून पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सरु होण्याची शक्यता आहे.