Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना हटकल्याचा राग मनात धरून आरोपींनी डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणांना हटकल्याचा राग येऊन डॉक्टराच्या घरी जाऊन 10 ते 15 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरात घडली आहे,ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


रात्री कॅम्प नंबर पाचच्या कैलाश कॉलनी रस्त्यावरून डॉ सागर धुतोडे हे घरी जात होते. त्याचवेळी एक बाईकस्वार तरुण स्टंटबाजी करत होता. तेव्हा डॉक्टरांनी या तरुणांना हटकले होते व घरी निघून गेले. मात्र डॉक्टरांनी हटकल्याचा राग या तरुणांनी मनात धरुन ठेवला होता. 


शनिवारी रात्री, याच तरुणाने 10 ते 15 जणांची टोळी घेऊन डॉक्टरांच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात सागर आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हिललाईन पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून आरोपी अजय वाकोडे, संदेश बनसोडे आणि त्यांचे इतर तीन साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान डॉक्टरांवर हल्ल्या प्रकरणी उल्हासनगर शहरात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामान्य माणसाला अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचे पाहून रहिवाशांमध्येही संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच दखल घेत पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. इतर आरोपींचीही ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.