Navi Mumbai Accident News : जिथे सुरक्ष रक्षक म्हणून काम करत होता तिथेच डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील खारघरमधील उद्यानात चार वर्षीय मुलीचा हृदयद्रावक अंत झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील खारघरमध्ये ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. खारघर सेक्टर 12 येथील उद्यानात चिमुरडीचा मृत्यू झालाय.   सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असलेल्या प्रकाश विश्वकर्मा यांची मुलगी ब्रीजा प्रकाश विश्वकर्मा (वय- 4 वर्ष) ही आपल्या वडिलांसोबत खारघर येथील उद्यानात खेळायला गेली होती. ब्रीजा खेळत असताना तिचे वडील एका बेंचवर बसले होते. खेळता खेळता ब्रिचाला दम लागल्याने ती तिथेच एका बेंचवर बसण्याकरता गेली परंतु बेंच नादुरुस्त आणि बिघडलेला असल्याने तोच


बेंच ब्रिजाच्या अंगावर पडला. 


अंगावर बेंच पडलेला बघून ब्रिचाच्या वडिलांना मोठा धक्का बसला. तात्काळ बेंच उचलण्यासाठी गेलेल्या वडिलांनी कसेबसे ताकतीने बेंच उचलून बाजूला केला परंतु अंगावर पडलेल्या बेंचच्या भारी वजनामुळे ब्रिजाने जागीच आपला जीव गमावला.  मुलीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी ब्रिजाला मृत घोषित केले. या उद्यानाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.  उद्यानाची दुरवस्था झाली आहे यामुळे दुर्घटना घडल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. 


खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून चिमुरड्याचा मृत्यू


नागपूरमध्ये दहा महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दहा महिन्यांचा चिमुरडा खेळता-खेळता पाण्याच्या बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला होता. नागपूरच्या सद्गुरु नगर येथे ही दुर्देवी घटना घडली. संदीप परतेकी हे आपल्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहतात. संदीप यांची पत्नी दुपारच्या सुमारास झोपली होती. तेव्हा अनय हा दहा महिन्यांचा चिमुरडा रांगत रांगत घरासमोरच्या पाण्याने भरलेल्या बादलीपर्यंत पोहोचला. हा प्रकार काही वेळाने निदर्शनास आला. मुलाला वाचवण्याचे डॉक्टर्सनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.