प्रवीण दांडेकर, झी मीडिया, गोंदिया:  प्राणी आपल्या भागात शिरले की आपल्याला प्रचंड त्रास होतो कधी आपण ऐकतो की कोणी एका प्राणी आपल्या विभागात शिरला आहे त्यामुळे आपण फार जास्त चिंतेत राहतो. अनेकदा वाघ, साप, (python) अजगर हे घरात, स्वयंपाक घरात (kitchen) घुसल्याच्याही घटना आपण ऐकत असतो. तेव्हा अशीच एक घटना गोंदिया (gondiya) तालुक्यात घडली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे आलेल्या हत्तीनी तर बघता बघता सगळंच चौपट करून टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा गोंदिया जिल्ह्यात एन्ट्री मारली असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचे मोठे नुकसान केले आहे, हत्तीच्या एंट्रीने पुन्हा वन विभागाची चमू दाखल होत कामाला लागली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून 13 ऑक्टोबरला हत्तींच्या (elephant news) कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, नागणडोह, तिडका परिसरात एन्ट्री करून चांगलाच धुमाकूळ घातला होता, त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात (jungle) परत गेला होता. 


नेमका प्रकार काय? 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


मात्र काल बुधवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हजेरी लावून कापणी केलेल्या धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकरी (farmers) आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मागील महिन्यात हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागनडोह येथील वसाहतीत (elephant video) धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यामुळे या वस्तीतील 35 ते 40 नागरिकांना बोरटोला येथील शाळेत ठेवण्यात आले, अनेक धान पिकाचे देखील नुकसान केले होते. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


नागरिक हवालदिल: 


कालांतराने हत्तीचा कळप गडचिरोलीत परत केल्याने वन विभाग निवांत झाले होते. मात्र काल हत्तींचा कळप उमरपायली परिसरातून जांभळी, घोगरा, गंधारी व नागणडोहकडे गेल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे, त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना (alert) सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाच्या कर्मचायांनी केल्या आहेत.