अरे बापरे ! 30 पेक्षा जास्त गव्यांचा वावर, शेतकऱ्यांना धडकी
Gawa in Kolhapur : जिल्ह्यात पुन्हा एकदा गव्यांचा वावर दिसून येत आहे. 30 हून अधिक गवे दिसल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे.
कोल्हापूर : Gawa in Kolhapur : जिल्ह्यात पुन्हा एकदा गव्यांचा वावर दिसून येत आहे. पन्हाळा तालुक्यात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले आहे. 30 हून अधिक गवे दिसल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे. दरम्यान, काही गव्यांना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात काही ग्रामस्थांना यश आले आहे. (Gawa at Panhala in Kolhapur)
पन्हाळा तालुक्यात गव्यांचा कळपच दिसून आला. गव्यांचा वापर दिवसागणिक वाढत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गव्यांचे दर्शन झाले.
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पन्हाळा तालुक्यातील वाघवे पैकी खोतवाडी या परिसरात गव्यांचा वावर दिसून येत आहे. राधानगरी- आजरा परिसरातील अभयारण्यात मोठ्या प्रमाणात गवे आहेत. अनेकवेळा त्यांचे कळपाने दर्शन होते. मात्र पन्हाळा तालुक्यात पहिल्यांदाच एव्हडे गवे एकाचवेळी दिसले आहेत. दरम्यान, यावेळी शेतीचे नुकसान होऊ नये, म्हणून ग्रामस्थांनी गव्यांना जंगलाच्या दिशेने उसकवून लावले.
दरम्यान, याआधी पुणे तसेत सांगली येथेही गवे दिसून आले होते. मिरज तालुक्यातील धामणी, बामणी परिसरात गवा (Gawa in Dhamani-bamani) दिसून आला. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे (Forest department) पथक घटनास्थळी धावले. पायांच्या ठशांवरून तो गवा असल्याचे समोर आले.