चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक: सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील निराधार वयोवृद्ध धोंडीबा हनुमंता जेडगुले चार महिन्यापूर्वी गावातून न सांगता निघून गेले. हे आजोबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये (Ratnagiri) एका चहाच्या टपरीवर होते. तेव्हाच एक शिक्षक चहा पीत होते. शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली त्या माध्यमातून सिन्नरचे खंबाळेतील पोलीस पाटील यांना खात्री पटली व त्यांनी त्वरित या आजोबांना (grandfather) सिन्नरला आपल्या खंबाळे गावात घेऊन आले. (a lost senior citizen found to netizens via whatsapp see the emotional story)


कसं शोधलं आजोबांना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसापूर्वी तराळा ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथील बस स्टँडच्या (bus stand) चहाच्या टपरीवर काही शिक्षक चहा पीत असताना त्यांना हे वयोवृद्ध बाबा दिसले. बाबा काही सांगत नव्हते. फक्त सिन्नर (sinnar) असा उल्लेख त्यांच्या बोलण्यातून येत होता. त्या शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रूपवर (whatsapp) बाबाचा फोटो व माहिती पाठवली. सिन्नर तालुक्याचा उल्लेख असल्यामुळे संबंधित शिक्षकांच्या परिचयाचे सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे यांना याबाबत माहिती समजली त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती बाबांचे नातेवाईक अशोक गफले यांना दिली व बाबांना घेऊन येण्याचा निश्चय केला पण बाबा तिथे खरंच आहेत का याची शहानिशा होणे गरजेचे होते.


त्यांनी सांगितले की माझ्या गावातील एक निराधार वयोवृद्ध इसम तराळा रत्नागिरी येथे असून याबाबत तिथून काही माहिती मिळू शकते का? त्वरित स्थानिक रत्नागिरीतील नागरिकांनी एसटी स्टँड परिसरात जाऊन बाबांचा शोध घेतला व बाबांची चौकशी करून खंबाळे तालुका सिन्नर येथील पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क (whatsapp contact) करत भावांची ओळख पटवली व बाबांना आपल्या सोबत घेऊन आपल्या बंगल्यात आले. बाबांना नवीन कपडे व सर्व जेवणाची व्यवस्था करत खंबाळे तालुका सिन्नर येथील पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे यांना तराळे गाव येथे येण्याचा मार्ग सांगितला त्याप्रमाणे काल रात्री खंबाळे तालुका सिन्नर येथील पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे व बाबांचे नातेवाईक अशोक गफले यांनी जाऊन बाबांना ताब्यात घेतले व सुखरूप आपल्या खंबाळे गावी आणले.  


अशी जुळते गावाशी नाळ...


त्यात एकच गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे गावाशी नाळ जुळलेला पोलीस पाटील व आपल्या कर्तव्याप्रति सजग असलेल्या पोलीस पाटील आपल्या गावातील कोणतीही बाब गांभीर्याने घेतो. संघटन कोणतही असो सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने समाजातील बरेचसे प्रश्न सोडवू शकत. खंबाळे ता. सिन्नर जि.  नाशिक येथील पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे व तराळा ता. संगमेश्वर जि.  रत्नागिरी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील वैशाली सुर्वे तसेच बाबांबद्दल व्हॉट्सअपद्वारे माहिती देणारे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील संघटनेद्वारे आपसात समन्वय साधून तत्परता दाखवणारे यांचे कौतुक करावे तेवढेच थोडे आणि या सर्व घटनेचा साक्षीदार होता आलं आणि संघटनेचा कसा उपयोग होतो याचा आणखी एक अनुभव आला.