Aaccident In Akkalkot Yatra : अक्कलकोटमध्ये ग्रामदैवताच्या रथयात्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे यात्रेच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. या यात्रेसाठी भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी झाली होती (Aaccident In Akkalkot Yatra). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्कलकोट तालुक्यातील वागदरीमध्ये ग्रामदैवताच्या रथयात्रेत ही दुर्घटना घडली. श्री परमेश्वराच्या रथाचं एक चाक अचानक निखळल्याने अपघात झाला. या अपघातात  दोन भाविकांचा मृत्यू झाला. परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक हा रथ ओढत होते. त्यावेळी हा अपघात झाला. 


वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वराच्या यात्रेमध्ये रथ ओढण्याची परंपरा आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक हा रथ ओढतात. साधारणपणे 12 फूट रुंद असलेल्या या रथाला दगडी चाक आहेत. रथ ओढत असताना अचानक एका बाजूचे चाक निखळल्याने दोन भाविकांचा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामदेवत परमेश्वर यात्रेतील पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत


सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा 834 वा दिव्य समाधी सोहळा  संपन्न 


सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा 834 वा दिव्य समाधी सोहळा रविवारी संपन्न झाला. सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अगदी पहाटेपासून योग समाधीची आरती, पूजा पार पडली. त्यानंतर महारुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी मंदिरात श्री सिद्धेश्वर महाराजांची महाआरती देखील संपन्न झाली. मंदिराचे पुजारी असलेल्या हब्बू परिवारावतीने सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. भक्ती पूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.