Bank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...
Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो. पण विरार येथील एका नागरिकाला मात्र हे मेल्स न पाहण्याचा जबरस्त झटका बसला आहे. बँकेकडून येणारे मेल न वाचल्यामुळे ग्राहकाला आर्थिक (financial) फटका बसला असून मेल न वाचल्याने बँकेने स्वतःहून सर्व्हिसेस चालू केल्या आणि त्यामुळे त्याचा फटाका म्हणून ग्राहकाच्या बॅंक खात्यातील 77 हजार गेल्या दोन वर्षात कापले गेल्याचा धक्कादायक (shocking news in virar) प्रकार समोर आला आहे. विरारच्या आयसीआयसी बँकेतील हा प्रकार घडला आहे. (a man faces money cut from his bank account because he didnt reply to bank service mails)
नक्की काय घडला प्रकार?
बँकेकडून येणारे मेसेज तुम्ही वाचणे टाळत असाल तर ही बातमी (virar news) तुमच्यासाठी आहे कारण विरार मध्ये एका बँक ग्राहकाला बँकेकडून येणारे मेल न वाचणे चांगलेच महागात पडले आहे. विरारमध्ये राहणारे रवी कुमावत यांच्या कुमावत क्लासेसचे आयसीआयसीआय बँकेत करंट अकाउंट आहे. त्यांना बँकेमार्फत वेगवेगळ्या सुविधांचे मेल पाठविले जातं होते मात्र ते न वाचल्याने बँकेने स्वतःहून या सर्व्हिसेस (bank services) त्यांच्या बँक खात्यात ऍक्टिव्हेट केल्या. ज्यात गेल्या दोन वर्षात त्यांच्या खात्यातून 77 हजार रुपये कापले आहेत.
हेही वाचा - गुगल सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान
हा सर्व प्रकार रवी कुमावत यांना समजल्यानंतर त्यांनी बँकेत भेट देत जाब विचारला असता, बँकेकेडून येणारे मेल न पहिल्याने स्वतःहून या सर्व्हिसेस ऍक्टिव्हेट झाल्याचे कारण बँकेने त्यांना दिले आहे. या प्रकारबाबत आम्ही बँक मॅनेजर यांना विचारना केली असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा देत, ही चूक सुधारणार असल्याचे सांगत..कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
काय आहे तक्रारदाराचे म्हणणे?
जेव्हा मला कळलं की माझ्या बॅंक खात्यामधून काही पैसे कापले (money cut) गेले आहेत तेव्हा याची दखल घेण्यासाठी मी बॅंक कर्मचाऱ्यांसाठी संपर्क साधला तेव्हा मी जेव्हा माझ्या खात्याची तपासणी केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गेल्या 9 महिन्यात माझ्या खात्यातून पैसे कमी झाले आहेत. यामुळे मी त्वरित कर्मचाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली आणि त्यानूसार ते मला पैसे परत करणार असल्याचेही सूचित केले आहे. ही फार गंभीर बाब आहे कारण कोणतीही सेवा असेल तर त्याचा मेल बॅंकेकडून आला तर आपण त्याच्यावर हो, ही सेवा सुरू करा असा रिप्लाय दिल्यावरच ती सेवा सुरू केली गेली पाहिजे, परंतु माझी परवानगी नसताना परस्पर ती सेवा सुरू करण्यात आली आणि त्यामुळे माझे पैसे कापले गेले. हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. माझ्या मर्जीविरूद्ध हे घडलं आहे. मी तर गेल्या सहा महिन्यांपासून माझे मेलही पाहत नाही. मी सुशिक्षित आहे म्हणून निदान मला हा प्रकार कळला तरी परंतु कोणी इतके शिकलेले नसतात मग त्यांनी काय करायचं?, असा सवालही तक्रारदारानं मांडला आहे.